Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी

Please share if you like this post, Thank you

सर्व प्रथम लग्न झालेल्या सर्व नवीन जोडप्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या मराठी संस्कृती / marathi culture मध्ये लग्न झालेल्या नवीन नवरा-नवरी ला आडवून नाव घेण्याचा आग्रह घरातल्या सदस्यांकडून केला जातो. आणि अश्या वेळेला नवरीचे उखाणे (marathi ukhane for female) ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात, म्हणून आम्ही १०० हुन अधिक मराठी उखाणे नवरदेवासाठी (navariche ukhane) नविन उखाणे घेऊन आलो आहोत.

आमचे इतर Marathi Ukhane सुद्धा check करा…
Funny Marathi Ukhane for Female -> Click Here
Marathi Ukhane For Satyanarayan Pooja – सत्यनारायण पूजा उखाणे -> Click Here

Ukhane in Marathi for Male, Marathi Ukhane for Female

1- गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
_______ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.

2- माहेर सोडून येताना, डोळ्यात होते आसू,
______ रावांच्या प्रेमळ संसारात, ओठावर असतं हासू.

3-स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली उडी,
_______ रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी.

4- गुणवान पती मिळावा, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
______ राव माझ्या, जीवनातील मौल्यवान ठेवा.

5- पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
_____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला.

6- सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे,
______ रावांना दान दिले, मला जन्माचे.

7- मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद,
_______ रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.

8- नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
_______ रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.

9- चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र,
_______ रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.

10- असंख्य तारे, नभात पहावे निरखून,
_______ रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.

Romantic Ukhane in Marathi <— रोमँटिक उखाणे वाचा

11- सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा,
_______ रावांमुळेच लागला मला, त्यांचा लळा.

12- घरावर परड परड्यात गहू, तुमच्या आग्रहासाठी,
___________ रावांचे नाव, किती वेळा घेऊ.

13- शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता,
_______ रावांची जोड जणू, सागर आणि सरिता.

14- लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
__________ रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

15- जेवणाला चव यायला, लागते मीठ,
________ दिसते घाबरी, पण आहे खूप धीट.

Traditional Ukhane in Marathi <—क्लिक करा.

16- मुंबई आहे सर्वांच्या, स्वप्नांची नगरी,
मी सुखी आहे कारण, ______ राव पडले माझ्या पदरी.

17- पहिल्या पावसात, मातीचा छान आला सुगंध,
_________ राव माझ्या आयुष्यात आल्याने, भेटला मला आनंद.

18- हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम,
________ रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.

19- आई वडिलांनी केले संस्कार , शिक्षणाने केले सक्षम,
______ सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

20- दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
_______ राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

21- देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,
खूप खुश आहे आज मी, कारण ______ सोबत माझे लग्न जुळाले.

22- सर्व कार्याचा पाठीराखा, विघ्णहर्ता गणेश,
_________ राव हेच माझ्या, जीविताचे परमेश.

23- कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर,
_______ च्या मदतीवर, सगळा माझा जोर.

24- ७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन,
_____ रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण.

25- आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,
________ रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.

26- सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
______ रावांच्या मांडीवर ______ घेते झोप.

27- आंबे वनात, कोकिळा गाते गोड,
________ रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड.

28- गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
_________ रावांचे नाव घेते ______ ची सून.

29- लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर ________ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.

30- सासरे आहेत प्रेमळ, सासूबाई आहेत दयाळू,
_______ रावांचे नाव घेते, आहेत खूप मायाळू.

31- गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले,
_____________ च्या साठी, गाव पाहिले.

32- संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
______ रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

33- संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
______ रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.

34- नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार,
_______ रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.

35- मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
________ रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

36- आयुष्यात सु:ख-दुःख, दोन्ही असावे,
______ रावांचे प्रेम, माझ्यावर सदैव असावे.

37- वडिलांची छाया, आईची माया,
_________ रावांच्या सुखासाठी, झिजवते काया.

38- रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे,
_______ रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.

39- सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा,
______ राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.

40- आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,
______ रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.

41- चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप,
________ रावांसाठी केले, ५ वर्ष तप.

42- आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
________ च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

43- कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता,
माझे जीवन अर्पण, ______ रावांकरिता.

44- प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला,
ते खूप सुंदर आहे, हे _______ रावांमुळे कळले मला.

45- चांदीच्या नक्षीदार ताटाला, सोन्याचा गिलावा,
________ रावांसारखा गुणी पती, जन्मोजन्मी मिळावा.

46- रखरखत्या वैशाखात, प्रेमाचा धुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला, ________ मुळे सारा.

47- लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ,
________ रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ.

48- चालली सप्तपदीचे, सात पावले,
_______ रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

49- श्लोक रामदासांचे, आहेत किती छान,
______ रावांच्या संसारात, हरवले मी भान.

50- कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण,
______ रावांची आणि माझे जुळले, ३६ गुण.

51- उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात ______ आणि _______ ची जोडी आहे जबरदस्त.

52- लग्नात हुंडा मागून, नाते करू नका घाण,
________ रावांसारखे पती मिळाले, मला फार आहे त्यांचा अभिमान.

53- दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता,
______ रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.

54- रत्नागिरीला आहे देवस्थान, गणपतीपुळे,
कोकणामध्ये सासर भेटले ________ रावांमुळे.

55- सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी,
__________ राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.

56- दारा वरती काढली, लक्ष्मीची पावल,
________ रावांचे साधे रूप, माझ्या मनाला भावल.

57- काचेच्या पेल्यात, सुख दुःखाचे पेय,
________ रावांना कीर्ती मिळावी, हेच माझे ध्येय.

58- संगमरवरी देवळात बसविली, साईंची मूर्ती,
________ रावांशी लग्न झाले, झाली इच्छा पूर्ती.

59- रिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात,
_________ रावांचे नाव घेते, राहुद्या लक्षात.

60- पंढरीच्या यात्रेत, विठ्ठल नामाचे गजर,
______ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.

61- यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली,
_______ रावांची जन्मदाती, धन्य ती माउली.

62- श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष,
________ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

Marathi Ukhane for Girls | मुलींसाठी उखाणे.

Marathi Ukhane for Bride हे खास नवीन वधू साठी बनवले गेले आहेत.लग्न म्हंटले त्यात उखाणेचा कार्यक्रम आलाच. नवीन वधू आणि वराला उखाणे घ्यावेच लागतात. उखाणे महिलांसाठी खूप आवडीची गोष्ट आहे. हे समजायला फार सोपे आहेत.

आपल्या पतीचे नाव घेऊन ते उखाणे घेतात. महिलांच्या काही कार्यक्रमात उखाणे घेतले जातात. लग्नात तर उखाणे घेणे आवश्यक्यच आहे. हे उखाणे तुम्ही सहज डाउनलोड आणि कॉपी करू शकता.

1- प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले,
_________ रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.

2- हळद लावण्यासाठी, बसली मी पाटावर,
_____ रावांच नाव काढलंय, मेहंदीने हातावर.

3- आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
______ रावांसाठी, सोडून आले मी सारे.

4- परिवार खुश राहील, जोडून नाती घट्ट,
______ पुरवतील आता, माझा सर्व हट्ट.

5- एकविरा आईच्या मंदिरात, नवसाच्या रांगा,
_______ रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.

6- आई-वडिलांना काळजी होती, कसे मिळेल घर,
__________ रावांसारखे, शांत मिळाले वर.

7- स्वप्नातला गुलाब, गालात हसला,
________ रावांचे नाव घेण्यास, मान कसला.

8- गेल्या त्या आठवणी , आणि गेले ते दिवस,
______ आज आहे आपल्या आयुष्याचा, सुखाचा दिवस.

9- गुलाबाचे फुल छान वाटते, मुलींच्या केसावर,
_______ रावांचे नाव सदैव, माझ्या ओठावर.

10- शेवटी आज आला, तो आनंदाचा दिवस,
______ रावांसारखे पती मिळावे म्ह्णून, केला होता नवस.

11- सोसायटी मध्ये बॅडमिंटन खेळताना, झाली होती सेटिंग,
________ सोबत लग्नाची झाली, माझ्या घरी मीटिंग.

12- तुमच्या सर्वांच्या साक्षीने, घेतला हातात हात,
________ रावांची लागली मला, सात जन्मासाठी साथ.

13- दिन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे,
_______ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे.

14- छान वाटतो नव्या नवरीला, साडीचा रंग हिरवा,
__________ आता मला ची सून लवकर बनवा.

15- शेगावचे गजानन, शिर्डीचे साई,
_______ रावांचे नाव घेते, सागर ची आई.

16- मुंबईला म्हणतात, स्वप्नांची नगरी,
मी खुश आहे कारण मी पडली, ________ रावांच्या पदरी.

17- देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन,
_________ मुळे झाले, संसाराचे नंदन.

18- पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,
________ च नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.

19- ताटभर दागिन्यांपेक्षा, माणसं असावी घरभर,
_________ रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा जन्मभर.

20- पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात,
_____ रावांचे नाव घेते ______च्या अंगणात.

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी नवीन उखाणे.

21- तलावात उगवतात सुंदर कमळ,
_____ रावांच नाव घेते, आहेत खूप प्रेमळ.

22- चला सगळे घरी, संपली आमची वरात,
________ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.

23- कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी,
_______ रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.

24- कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार,
__________ आहेत माझे, फेव्हरेट स्टार.

25- लग्न आटपले, आणि काढली वरात,
________ सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.

26- अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा,
________ रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.

27- आकाशातून पडतो, तुटता तारा,
________ मध्ये आहे, माझा जीव सारा.

28- इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
_______ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.

29- अलिबागला जाताना , मज्जा येते होडीने.
__________ घरात प्रवेश करू जोडीने.

30- आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी,
___________ तुमची साथ हवी, सात जन्मी.

31- गाव माझे सातारा, आणि जिल्हा आहे कराड,
_________ आपल्या लग्नात, खूप आहे व्हराड.

32- सर्जेराव पाटलांची, आहे मी लेक,
________ आहेत माझे, एकुलते एक.

33- भाजीत भाजी, गवाराची,
______ आहेत कदमांचे, आणि मी आहे पवारांची.

34- छान वाजवतात , कार्यक्रमात हलगी,
_______ राव आहेत बिझनेसमन, आणि मी शेतकऱ्याची मुलगी.

35 – काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा,
________ रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.

36- कोशिंबीर बनवण्यासाठी, कांदे ठेवले कापून,
________ रावंच नाव घेते, सर्वांचा मान राखून.

37- मला आवडते, सर्वांची काढायला खोड,
_______ रावांचे बोलणे, मधापेक्षा गोड.

38- कोकणाला जाताना, लागतो आंबा घाट,
_______ रावांच नाव घेते, सोडा माझी वाट.

39- आकाशात दिसतात, निळे निळे ढग,
_________ सोबत फिरेन मी, संपूर्ण जग.

40- कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले,
_______ रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.

41- लग्नासाठी सोडून, आले मी माहेर.
_______ आहेत माझ्या, सौभाग्याचा आहेर.

42- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आहेत चार,
_______ रावांनी घातला गळ्यात, मंगळसूत्राचा हार.

43- आई वडील आहेत, मुलांची छाया,
___________ ला आहे, खूप माया.

44- प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी,
______ रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी.

45- चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार,
_______ रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.

46- शुभमंगल झाले, आणि अक्षता पडल्या माथी,
_______ राव आजपासून, माझे जीवनसाथी.

47- देवापुढे मागते, सर्वाना चांगले भेटूदे आरोग्य,
_______ रावांच्या रूपात मिळाला, जीवनसाथी योग्य.

48- एका लग्न समारंभात, झाली आमची भेट,
_______ रावांनी २ महिन्यात, मला बायको बनवून घरी न्हेली थेट.

49- कोकणातील जंगले आहेत, सुंदर आणि घनदाट,
________ रावांसोबत बांधली अखेर, लग्नाची जीवनगाठ.

50- तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
________ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

51- जीवनात सदैव आई वडिलांचा, आशीर्वाद असावा पाठी,
_______ रावांसारखे पती मिळावे, साथ जन्मा साठी.

52- स्त्रियांनी नवस केला, पती मिळावा सत्यवान,
_______ राव भेटले म्हणून, आहे मी भाग्यवान.

53- मोर आहे भारताचा, राष्ट्रीय पक्षी,
_______ रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.

54- श्रीमंत माणसांना असते, पैशाची धुंदी,
_______ चे नाव घेण्याची, हि पहिलीच संधी.

55- केस माझे कुरळे, सावली पडली गालावर,
_______ रावांचे नाव घेते, मैत्रिणींच्या बोलावर.

56- मखमली हिरवळीवर, पाखरांचा थवा,
_____ रावांच्या वंशात, लावीन दीप नवा.

57- लग्नानंतर सर्व स्त्रिया, होतात जबाबदार,
_____ राव दिसतात, फारच रुबाबदार.

58- कोकिळाने लावला, झाडावर बसून सूर,
_________ रावांच्या आयुष्यात येऊदे, सुखाचा पूर.

59- चांदीची जोडवी, पतीची खून,
______ रावांचे नाव घेते_______ घराण्याची सून.

Shankarachi Marathi Ukhane | शंकराची मराठी उखाणे.

Shankarachi Marathi Ukhane हे खास लग्नकार्यासाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे तुम्ही सहज घेऊ शकता. हे उखाणे शंकर आणि पार्वती देवांना अनुसरून बनवले गेले आहेत. भगवान शंकराचे आपल्या देशात खूप भक्त आहेत. उखाणे हे भारतामध्ये प्रत्येक लग्नात घेतले जातात.

उखाणे म्हंटले तर परिवाराच्या प्रत्येक व्यक्तीला ऐकण्याचीघाई असते. Shankarachi Marathi Ukhane हे तुम्ही कुठेही अगदी सहजपणे शेयर करू शकता. आपल्या मित्रपरिवारांना देखील पाठवू शकता. शंकराची उखाणे हे महिलांचे खूप आवडीचे आहे.

1-चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे,
__________ च नाव घेते देवापुढे.

2- गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र,
_____ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

3- हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

4- शंकर पार्वतीचे, हिमालय आहे उगमस्थान,
____ रावांचे नाव घेऊन, ठेवते सर्वांचा मान.

5- लग्नकार्य हा आयुष्यातील एक, महत्वाचा भाग आहे,
________ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव असाच राहे.

Smart Marathi Ukhane Female | स्मार्ट मराठी उखाणे.

Smart Marathi Ukhane female हि भारतीय संस्कृतीमधील एक परंपरा आहे. जेव्हा एखादे नवीन वधू आणि वर लग्न करतात तेव्हा हे उखाणे म्हंटले जातात. उखाणे म्हणताना सर्व लोक मन लावून ऐकतात आणि ते खूप मजेशीर असते.

हे इंटरनेटवर तुम्हाला फार कमी मिळतील. उखाणे हा क्षण नवरा आणि नवरीसाठी खूप आनंदाचा असतो. एक दुसऱ्याचे नाव घेणे २ ओळींमधून हे फार मजेशीर आहे. प्रत्येक लग्नकार्यात उखाणे हे म्हंटले जातात.

1- रायगडावर केले मी, शिवरायांचे दर्शन…
________ रावांच्या प्रेमासाठी, संपूर्ण जीवन अर्पण.

2- मंगळसुत्रात असतात ,काळे मणी,
_________ राव आहेत, माझे धनी.

3- फुलांचा सुगंध, दरवळला चहूकडे,
_______ रावांचे नाव, मोठं होउदे सगळीकडे.

4- चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा,
_______ रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.

5- संत्री ला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज,
__________ आणि माझे झाले लव्ह मॅरेज.

6- निवडणूक लढायला, आहेत खूप पक्ष,
________ रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्ष.

7- कोकणात आहेत, जंगल घनदाट,
_______ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

8- आहे मी एकुलती एक, नाही कधी वाईट केले कसले सेवन,
______ तुमच्यासाठी शिकेन मी, बनवायला जेवण.

9- विवाहाच्या मंडपात, सुंदर फुलांचा थाट,
______ रावांचे नाव घेऊन बांधते, वधू वराची गाठ.

10- आवडता ऋतू आहे, आमचा पाऊस,
______ रावांना माझे नाव घेण्याची, खूप हाऊस.

11- संस्कृत भाषेमुळे, सर्व भाषा झाल्या तयार,
_______ रावांचे इंग्रजी ऐकून, झाले मी घायाळ.

12- आई बाबा आहेत, सर्व प्रथम गुरु,
______ रावांसोबत आजपासून, पुढचा प्रवास सुरु.

13- आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर पाहिजे जिद्द,
__________ रावांसोबत राहून करेन, संपूर्ण स्वप्न सिद्ध.

14- मंडप सजवण्यासाठी, आणली छान छान फुले,
_______ रावांचे नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.

15- हिमालय पर्वतावरून, नदी वाहते कलिका,
_______ रावांचे नाव घेते, मी पाटलांची बालिका.

16- वोटिंग करण्यासाठी, लाईन लागली क्रमाने,
_______ रावांचे नाव घेते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

17- सर्वांच्या नावाप्रमाणे, वेगवेगळ्या आहेत राशी,
_________ रावांचे चरण, हीच माझी अयोध्या काशी.

18- नूतन वर्षाचा शुभारंभ करीत, येतो पाडवा,
_______ रावांच्या सानिध्यात, राहो सदैव गोडवा.

19- ऊन पावसात कष्ट करून, पिकवलं शेतात सोन,
_________ राव हेच माझ्या, सौभाग्याच लेणं.

20- पैठणी साडी आहे, महाराष्ट्राची शान,
________ रावांचे नाव घेताना, मला वाटतो अभिमान.

21- कपाळावर कुंकू, जसा चंद्रकोर चा ठसा,
_________ रावांच नाव घेते , सर्वजण बसा.

22- गणपती बाप्पाचे, चरण स्पर्श करते खाली वाकून,
_______ रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून.

23- देवा सारखा पिता, आणि देवी सारखी माता,
_________ राव मिळाले, स्वर्ग आला हाता.

24- नव्या नवरीचा आज उतरला साज,
खऱ्या अर्थाने गृहिणी ________ रावांची झाले आज.

25- श्रीमंत असोवा गरीब असो, स्त्रियांना आवडते माहेर,
_________ रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर.

Ukhane in Marathi For Female | मराठी उखाणे.

Ukhane in Marathi for Female हे खास महिलांसाठी बनवले गेले आहेत. उखाणे शिवाय महाराष्ट्रातील लग्न हे अपुरे आहे आणि उखाणे घेणे हि महाराष्ट्राची परंपरा आहे. उखाणे म्हंटले कि महिलांना फार उत्साह असतो.

तुम्ही Ukhane in Marathi for Female हे अगदी सहज डाउनलोड आणि कॉपी करू शकता. या वेबसाइट वर तुम्हाला नवीन उखाणे मिळतील. हे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता.

1- पुण्याला आहे आळंदी ,
_________ माझ्या आयुष्यात आले, म्हणून आहे मी आनंदी.

2- महाराष्ट्रात असावे, मराठी भाषेचे वर्चस्व,
_________ राव आहेत, माझे सर्वस्व.

3- भजन करताना लागते टाळ, ढोलकी आणि विना,
______ रावांचे नाव घेते, जय महाराष्ट्र म्हणा.

4- चांदीची जोडवी, पतीची खूण,
_________ रावांचे नाव घेते, आजपासून झाली _घराण्याची सून.

5- लग्नात बांधला, सर्व पाहुण्यांनी फेटा,
_______ रावांच्या संसारात, माझा आहे अर्धा वाटा.

6- दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,
______ रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.

7- शेतामध्ये पावसात, नाचत होता मोर,
_______ रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.

8- संध्याकाळची बत्ती लावायचा, टाईम असतो सात,
_______ रावांना देईल मी, जन्मो जन्माची साथ.

9- लग्नाच्या आधी, बांधला नवीन बंगला,
_______ रावांच्या प्रपंचात, जीव माझा रंगला.

10- आई वडील, पहिले माझे गुरु,
________ रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.

11- पैठणीवर शोभे, सुंदर मोरांची जोडी,
_______ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

12- होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात, घेतात सर्व उखाणे,
_______ रावांमुळे माझे, आयुष्य चालले आहे सुखाने.

13- सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात,
______ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या वृंदावनात.

14- येवले चहा म्हणजे, प्रेमाचा,
_________ रावांचे नाव घेते, मान राखुन सर्वांचा.

Navriche Ukhane in Marathi | नवरीचे उखाणे.

Navriche Ukhane हे खास वधूसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे नवीन आणि सोपे आहेत समजायला. उखाणे म्हंटले कि नवीन नवरीसाठी फार उत्साह असतो. उखाणे घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.

एखाद्या स्त्रीसाठी जर तिचे लग्न होते असेल तर Navriche Ukhane या वेबसाईट मध्ये भेटतील. मुलींना नवीन उखाणे वाचायची खूप आवड असते. या वेबसाईट वर खूप नवीन उखाणे वाचायला मिळतील.

1- अलिबाग चा बीच, छान आहे फिरायला,
______ लग्नानंतर जाऊ आपण, एकविरा आईचे दर्शनाला.

2- कामाला आहेत हे, भारताच्या बाहेर,
______ रावांसाठी सोडून, आले मी माहेर.

3- पहिल्या पावसाने, संपूर्ण निसर्ग होतो हिरवागार,
_______ रावांच्या नावाने घालते, गळ्यात मंगळसुत्रचा हार.

4- गणपती बाप्पाचे नाव, नेहमी माझ्या मुखी,
_______ रावांना ठेवेल मी, आयुष्यभर सुखी.

5- आवडता ऋतू आहे, माझा हिवाळा,
_______ रावांवर आहे, माझा खूप जिव्हाळा.

6- नाशिक चे द्राक्ष, आणि कोकणातले नारळ,
________ रावांचे नाव घेते, साधे आणि सरळ.

7- कॉलेजमध्ये असताना, हात धुवून लागले मागे,
__________ रावांशी जुळले, आयुष्यभराचे धागे.


Please share if you like this post, Thank you

1 thought on “Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी”

Leave a Comment