सर्व प्रथम लग्न झालेल्या सर्व नवीन जोडप्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या मराठी संस्कृती / marathi culture मध्ये लग्न झालेल्या नवीन नवरा-नवरी ला आडवून नाव घेण्याचा आग्रह घरातल्या सदस्यांकडून केला जातो. आणि अश्या वेळेला नवरदेवाचे उखाणे (marathi ukhane for male) ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात, म्हणून आम्ही १०० हुन अधिक मराठी उखाणे नवरदेवासाठी (navardevache ukhane) नविन उखाणे घेऊन आलो आहोत जेणेकरून भाजीत भाजी मेथीची, … सारखी बोरिंग नाव घेण्याची वेळ येऊनये… हाहाहा.
Ukhane in Marathi for Male, Marathi Ukhane for Male
मंगल कार्याची सुरवात होते श्री गणेशाचा पूजे पासुन, आणि ………. च नाव घेयला सुरवात केली आज पासून ।।
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, ….. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, ….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
मराठी उखाणे नवरदेवासाठी | New Marathi Ukhane for male
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
पोर्णिमेचा चंद्र असतो गोल …….समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, …….तू मला, सुपरवूमन वाटतेस.
Ukhane in Marathi for Male | नवीन मराठी उखाणे नवरदेवासाठी
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी …व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने सारे श्रम हरती.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.
प्रेमाच्या राणात, नाचतो मोर, ……..शी केल लग्न, नशीब माझ थोर.
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,…… ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, ……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,…….. ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागे पळतंय,
……… माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय.
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,…. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
Ukhane Marathi for Male
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,…….. आहे माझी ब्युटी क्वीन.
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,…….. तू फक्त, गोड हास.
गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,…..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
एका वर्षात, महिने असतात बारा…..मुळे वाढलाय, आनंद सारा!
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ……….. चे नाव, कायम ओठी यावे.
गर गर गोल, फिरतो भवरा, ………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.
मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …….. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
marathi ukhane for male
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात.
केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ………. च नाव घेतो,
पीडू नका वायफळ.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली ……… माझ्या मनात…
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
जगाला सुवास देत उमलती कळी, …… चं नाव घेतो ……….. च्या वेळी.
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,…. समोर माझ्या, सोण सुद्धा लोखंड.
२ आणि २ होतात चार, …… सोबत करेल मी सुखाचा संसार.
काळी माती हिरवे रान, हृदयात माझ्या….. चे स्थान.
Navardevache Ukhane
प्रेमाची कविता प्रेमाचा लेख, ……माझी लाखात एक.
माझ्याशी लग्न करायला… झाली राजी, केल मी लग्न…..झाली माझी.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
………..च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,……….ला पाहून, पडली माझी विकेट.
स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, …समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ..मला मिळाली आहे अनुरूप.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
पक्षांचा थवा, दिसतो छान, … आली जीवनात, वाढला माझा मान.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …आहे माझे जीवन-सर्वस्व.
Funny Marathi Ukhane for Groom
दही चक्का तुप, … आवडते मला खुप.
नंदनवनात अमृताचे कलश, …आहे माझी खुप सालस.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …. चे नाव घेतो ….च्या घरात.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, …चे नावं घेतो …च्या घरी.
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार …च्या गळ्यात.
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन.
Marathi Ukhane for Husband
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान…च्या रूपाने, झालो मी बेभान.
तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी… बघताक्षणी प्रेमात पडलो, __ ची लाल ओढणी.
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.
देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, …
चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …
चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
Marathi Ukhane for Marriage
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं…
माझं मन रोज नव्याने, …. च्याच प्रेमात पडतं.
गालावर खळी, डोळ्यात धुंदी…मुळे झाले, आयुष्य सुगंधी.
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल…माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.
नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे …चे रूप, आहे खूपच देखणे.
कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड …ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.
सोण्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्य भर देईन, ……ची साथ.
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.
Ukhane for Male | मराठी उखाणे नवरदेवासाठी
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……चे बरोबर बांधली जीवन गाठ
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, ……..
माझी नेहमी घरकामात दंग.
अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.
मातीच्या चुली घालतात घरोघर, …झालीस माझी आता चल बरोबर.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.
छान छान उखाणे
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी.
जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.
ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
जर तुम्हाला हे, नवरदेवाचे उखाणे (marathi ukhane for male) आवडले असतील तर तुमच्या मित्र परिवारा बरोबर नक्की शेयर करा.